शिवसेना : आंदोलने आणि चळवळी

१९६६-१९७२
१९६६: शिवसेना आणि बाळ केशव ठाकरे ह्यांची पहिली सार्वजनिक सभा.
१९६७: पहिली निवडणूक ठाणे महानगरपालिका
१९६८: भारतीय कामगार सेना स्थापना
भारतीय कामगार सेनेची स्थापना
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याच्या धोरणाने सुरू झालेली शिवसेना पुढे कामगार वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी या क्षेत्रातही उतरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ९ ऑगस्ट १९६८ या क्रांती दिनी नरेपार्कवर भरलेल्या जाहीर सभेत हजारो श्रोत्यांच्या साक्षीने शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचा चक्रांकित ध्वज फडकावला. शिवसेनेची भारतीय कामगार सेना ट्रेड युनियनिझम हा आपला धर्म मानील. कामगारांच्या हिताचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करेल. युनियनचे काम फक्त कामगारांसाठी झाले पाहिजे, असे या वेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले.
१९७०: हिंदुत्वाचा पहिला बिगुल…!
१९७० सालीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खरे तर हिंदुत्वाचा बिगुल वाजवला होता. परळमध्ये सर्वप्रथम विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेने प्रिं. वामनराव महाडिक यांना रिंगणात उतरवले. त्या वेळी जनसंघ, हिंदू महासभा अशा स्वतंत्र पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. ही पहिली-वहिली विधानसभा निवडणूक शिवसेनेने जिंकली आणि बाळासाहेब म्हणाले की, “आमचा विजय हा हिंदुत्वाचा म्हणजेच पर्यायाने खऱ्या राष्ट्रीयत्वाचा विजय आहे.”
१९७०: शिवसेनेचे पहिले महापौर डॉ. हेमचंद्र गुप्ते
१९७१: भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना
१० ऑगस्ट १९७१ रोजी भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थी सेनेचे उद्घाटन पार पडले. या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विद्यार्थांनी राजकारणापासून दूर राहावे, असे म्हणणाऱ्यांचा खूप समाचार घेतला. विद्यार्थांनी राजकारणात फार तर प्रत्यक्ष भाग घेऊ नये, पण त्याचं निरीक्षण आणि अभ्यास जरूर केला पाहिजे. ज्यांना उद्या या राष्ट्राची धुरा सांभाळायची आहे, त्यांनी राजकारणाबद्दल अज्ञानी राहून चालणार नाही, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले.
१९७२: महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये शिवसेनेचा उदय
१९७३: शिवसेनेचे महागाईविरुद्ध विशाल आंदोलन
१९७४: स्थानीय लोकाधिकार समिती- पांढरपेशा कामगारांसाठी शाखा
१९७५: बाळासाहेब ठाकरे ह्यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला. ’मार्मिक’ मध्ये त्याची घोषणा केली.
१९७८: निष्ठावंत शिवसैनिकांनी बाळासाहेबांना शिवसेनाप्रमुख पदावर कायम राहण्याची विनंती केली.बाळासाहेबांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला.
१९८०: बाळासाहेबांनी ए.आर.अंतुले ह्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला.
१९८२: बाळासाहेबांनी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले ह्यांना विनंती केलीं की कारखान्यातील कामगारांना पन्नास रुपयांची पगारवाढ द्यावी.
१९८४: इंदिरा गांधींच्या हत्त्येनंतर देशभरात शीख समाजाविरोधात दंगली सुरु असताना बाळासाहेबांनी मुबईतील शीख समाजाला संरक्षण देण्याची भूमिका घेतली.
१९८५: महिला आघाडीची स्थापना- शिवसेनेतील महिलासाठी .
१९८६: शिवसेनेचा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विस्तार.
१९८७: शिवसेनेने सर्वप्रथम हिंदुत्त्वाच्या मुद्यावर निवडणूक लढवली.
१९८८: संभाजीनगर( औरंगाबाद) निवडणूक
१९८९: शिवसेना आणि शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह ह्यांची नोंदणी करण्यात आली.
१९९०: शिवसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राज्यात उदय.
१९९२: बाळासाहेबांनी हिंदूंच्या बाजूने भूमिका घेतली.हिंदूंचे तारणहार म्हणून उभे राहिले.
१९९५: शिवशाही शासन
१९९७: शिवसेना मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत परत आली
१९९८: शिवसेनेला केंद्रामध्ये प्रथमच मंत्रीपद मिळाले
२००२: शिवसेनेला लोकसभा अध्यक्षपद मिळाले


