भारतीय कामगार सेना

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

जय जवान | जय किसान | जय कामगार

ताज्या घडामोडी

Latest News from Bharatiya Kamgar Sena

भारतीय कामगार सेनेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

भारतीय कामगार सेनेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. स्वर्गीय शिवसेना नेते दत्ताजी साळवी ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भारतीय कामगार सेनेने लाखो कामगारांच्या आयुष्य घडवलं असून भविष्यातही तेच कार्य सुरु राहिल असा विश्वास उद्धवसाहेबांनी व्यक्त केला. कामगारांच्या न्यायहक्कासाठी लढत असताना, त्यांचं हित प्रथम ध्येय ठेवून इतकी वर्ष अविरत काम करणे कौतुकास्पद आहे; असे उद्गार ह्यावेळी पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले. आपली शिवसेना महाराष्ट्रहितासाठी सदैव झटत आलीय आणि हीच गोष्ट लक्षत ठेवून काम करणाऱ्या कामगारांची फळी भविष्यात तयार झाली पाहिजे, असा आशावाद ह्यावेळी व्यक्त करत; भारतीय कामगार सेनेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, उपाध्यक्ष शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, सरचिटणीस उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेते आमदार मनोज जामसुतकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर आणि इतर भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

parallax background
 

Send us a message


Get in touch with Bharatiya Kamagar Sena


    Address


    Prafullaban Co-op Society,
    Ram Maruti Marg,
    Dadar West,
    Mumbai - 400028.
    Maharashtra