Tribute to Vandaniya Balasaheb Thackeray

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली

भारतीय कामगार सेनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना नेते, भारतीय कामगार सेना अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, कार्यध्यक्ष श्री. अजित साळवी तसेच अन्य पदाधिकार्‍यांनी आदरांजली अर्पण केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुंबईतील नवनिर्वाचित आमदार श्री. मनोज जामसुतकर, भायखळा विधानसभा मतदारसंघ; श्री. बाळा नर, जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघ; श्री. हारून खान, वर्सोवा विधानसभा मतदारसंघ यांचा यासमयी भारतीय कामगार सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.