शिवसेनेची जडणघडण

एखादी संस्था वाढविण्यासाठी खूप प्रशासकीय ज्ञान आणि कौशल्य असावे लागते.बाळासाहेब अतिशय शिस्तप्रिय आणि कार्यकुशल होते.

शिवसेनेची ध्येय आणि धोरणे

शिवसेनेच्या घटनेमधे स्पष्टपणे नमूद केलेली आहेत.नमूद केलेली उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत: आपण प्रथम भारतीय आहोत ही शिवसेनेची निष्ठा आहे. म्हणूनच देशद्रोहाचा प्रखर विरोध ही शिवसेनेची मूलभूत व अविभक्त भूमिका आहे.

तरुणांना व तरुणींना न्याय्य हक्काच्या प्राप्तीसाठी व राष्ट्रीय कर्तव्याच्या पूर्तीसाठी संघटित करणे व कार्यप्रवण बनविणे ,हे शिवसेनेचे मूलभूत उद्दिष्ट आहे.

राजकारणापेक्षा समाजकारणाला शिवसेना महत्त्व देते. स्वीकृत सामाजिक व राष्ट्रीय कार्याला गती देण्यासाठी व तेवढ्यापुरतेच ती राजकारणात प्रत्यक्ष भाग घेईल. जनसेवा व जनसंघटन हेच सामाजिक उद्दिष्टपूर्तीचे साधन आहे,अशी तिची धारणा आहे.

जात-धर्म-पंथ-भाषा-भेद शिवसेनेला मान्य नाहीत. तसेच इतरांनी ते मानू नयेत असा तिचा आग्रह आहे.