आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे
महाराष्ट्राला लाभलेले खरे पालक उद्धव बाळासाहेब ठाकरे
सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी मानून यशस्वी कारभार कसा करावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे.
त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीविषयी दोन शब्द...
पहिल्यांदाच महाराष्ट्राचे भाग्य उजळले आणि महाराष्ट्राला खरा पालक मुख्यमंत्री मिळाला. आजवर अनेक चालकही मिळाले होते. काही मालक बनू पाहत होते, मात्र जनाअनसाच्या मनातून जे खरे पालक मुख्यमंत्री लाभले, तेच उद्धव बाळासाहेब ठाकरे. अल्प कालावधीतच तमाम महाराष्ट्राच्य जनतेत घर करणारा हा संवेदनशील अनाचा राजकीय नेता वेळ, प्रसंगी गंभीर आणि सह्याद्रीसारखा खंबीर बनून राज्याचा कारभार समर्थपणे हाताळू शकतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. राज्याचा कारभार हाती घेताच कोरोनासारखे जागतिक संकट समोर येऊन ठेपले. या बिकट काळात उद्धव साहेबांनी घेतलेल्या निर्णयांमुळे एक धाडसी व जन सुरक्षेला सर्वोच्च स्थान देणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख जगासमोर आली. म्हणूनच तर देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत अग्रक्रम मिळवून देत खुद्द जनतेनेच त्याची पावती दिली. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर, हे माझे एकट्याचे यश नाही, सहा मह्न्याच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणार्या प्रत्येकाचे यश असल्याची प्रतिक्रिया उद्धवसाहेबांनी दिली. त्यावेळी प्रत्येक शिवसैनिकाला मीच मुख्यमंत्री असल्याचा भास आपोपाप अंगी भिनला होता. या बदलानंतर सर्वसामान्य माणसाला नवे आयामही लक्षात आले. कोरोनाचे संकट सर्वांच्याच मागे हात धुवून लागले असताना एक समर्थ मुख्यमंत्री लाभणे, हा सुयोग आहे. आपल्या सहकार्यांना आणि कार्यकर्त्यांना इतके महत्त्व देणार्या नेत्याच्या मनाचे मोठेपण किती अफाट असेल हे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. म्हणूनच त्यांचा मुख्यमंत्री कालावधीतील प्रत्येक निर्णय हा एक राजकीय नेता म्हणून नव्हे तर जनमाणसांचा प्रतिनिधी, त्यांचा कुटुंबप्रमुख म्हणून घेतला जात असे.
साहेबांचे हेच गुण आज करोडो सर्वसामान्य जनतेच्या मनात 'आपला कुटुंबप्रमुख' हे भावनात्मक स्थान निर्माण करून आहे...!


