Annual General Meeting : 2025
भारतीय कामगार सेनेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
भारतीय कामगार सेनेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा 19 एप्रिल, 2025 रोजी दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे पार पडली. कामगारांच्या न्यायहक्कासाठी लढत असताना, त्यांचं हित प्रथम ध्येय ठेवून इतकी वर्ष अविरत काम करणे कौतुकास्पद आहे; असे उद्गार ह्यावेळी पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले. आपली शिवसेना महाराष्ट्रहितासाठी सदैव झटत आलीय आणि हीच गोष्ट लक्षत ठेवून काम करणाऱ्या कामगारांची फळी भविष्यात तयार झाली पाहिजे, असा आशावाद ह्यावेळी व्यक्त करत; भारतीय कामगार सेनेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ह्यावेळी जेष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, उपाध्यक्ष शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, सरचिटणीस शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, उपाध्यक्ष शिवसेना उपनेते गुरुनाथ खोत, सरचिटणीस शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, संयुक्त सरचिटणीस संजय कदम तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

















